चांदवड तालुक्यात पाटे येथे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू , परीसरात हळहळ. नाशिक शांताराम दुनबळे.



नाशिक=लासलगाव येथुन जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील पाटे येथे  नुकतीच हृदयद्वायक मन हेलवणारी  बुधवारी दुपारी दोन सख्ख्या भावांचा घरच्याच शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती  पाटे येथिल पोलीस पाटील  श्री मच्छिंद्र कासव यांनी चांदवड पोलीस स्थानकाला दिली उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आई-वडिलांना ही दोनच मुले असल्याने आई वडील पूर्णता पोरके झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे



पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांचा मोठा मुलगा  ओम संजय तळेकर वय वर्षे 13 इयत्ता सातवी तर साहिल संजय तळेकर वय वर्षे 11 इयत्ता पाचवी हे दोघे सख्खे भाऊ शेताचे शेजारील असलेल्या नाल्या लगत बकऱ्या चारण्यासाठी गेलेले असताना हे दोघे त्यांच्या शेतातील शेततळ्यात कडेला आलेल्या शेवाळ काढत असतानाच पाय घसरल्याने पाण्यात बुडू लागला असता साहिल ही भाऊओम ला वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरला नशीबाची दोरी तुटल्याने दोन्ही भावांचा बुडून दुदैवी  मृत्यू झाला तालुका पोलीस स्थानकामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने