शिरपूरात ख्वाजा गरीब नवाज ट्रस्ट तर्फे विशेष लसीकरण मोहीम कोरोनाच्या नियमांचे पालन करुन वेळेवर लसीकरण करुन घ्यावे : बबनराव चौधरी






 शिरपूर : शहरातील विजय स्तंभाजवळील गोपी वेल्डींग जवळ बालाजी मंदीर रोड येथे शुक्रवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी कोविड लसीकरण विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या कोविड लसीकरण विशेष मोहिमेचे आयोजन माजीमंत्री आ. अमरिशभाई पटेल, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ख्वाजा गरीब नवाज ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते. लसीकरण मोहिम शिबीराचे उद्घाटन आ. काशिराम पावरा, भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रविंद्र अनासपूरे यांच्या हस्ते करण्यात आले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी होते. यावेळी तहसिलदार आबा महाजन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितू बत्रा, शिरपूर कृउबा समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, धोबी समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, शिरपूर पिपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, प्रताप सरदार, संजय आसापुरे, आबा धाकड, बबनलाल अग्रवाल, एन. डी. पाटील, शिरपूर पं. स. सदस्य चंद्रकांत पाटील, मुस्लिम तेली समाजाचे नेते सिद्दीक तेली, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, रविंद्र भोई, राधेश्याम भोई, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, मनोज भावसार, सतीष गुजर, रविंद्र सोनार, अविनाश शिंपी, शिंगावे माजी सरपंच आनंदा भिल, आदिंसह शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, पुरुष, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कोरोनाच्या नियमांचे पालन करुन वेळेवर लसीकरण करुन घेणे हाच प्रभावी उपाय करोनाला नियंत्रित ठेवू शकतो. म्हणुन सर्वांनीच तात्काळ लसीकरण करुन घेऊन स्वत: सह समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे तसेच वेगवेगळ्या साथीच्या आजारांना व डेंग्यू सह इतर आजार तात्काळ रोखायचे असेल तर लस शोधणे, आणि शक्य झाले तेवढे लसीकरण करुन घेणे हाच एकमेव उपाय आहे तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहान त्यांनी केले. कोविड लसीकरण विशेष मोहिमेचे आयोजन ख्वाजा गरीब नवाज ट्रस्ट अध्यक्ष रफीक तेली, उपाध्यक्ष मुबीन शेख, सचिव रहिम तेली, सहसचिव सलीम खाटीक, शरीफ तेली, जाकीर तेली, आसिफ तेली, शकील तेली व तेली युथ विंग पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते. या कोविड-१९ विशेष लसीकरण शिबीरात पहिला व दुसरा डोस मिळून ५५५ लाभार्थीना लसीकरण करण्यात आले तर वय १८ ते ४५ व ४५ वर्षे वरील नागरिकांसाठी कोविशील्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला मोहिमेचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला असे आयोजकांनी सांगितले.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने