शिरपूर - शिरपूर शहरातील काझी नगर मधील रहिवासी दादासो.विष्णू निंबा पाटील वाडी याचे चीरजीव तेजस विष्णू पाटील यांची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस [IFS] भारतीय वन सेवा परीक्षेत देशातून 23 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.
आपल्या धुळे जिल्ह्याची तसेच शिरपूर तालुक्याची व तालुक्यातील वाडी या गावाची मान स्वाभिमानाने उंचावून एक मानाचा तुरा रोवलेला आहे. शिरपूर तालुक्याचा नाव लौकिक संपूर्ण देशात प्राप्त केलेला आहे. एक सामान्य कुटुंबातील होतकरू, जिज्ञासु अभ्यासू व कष्टकरी स्वतःच्या कर्तुत्वावर ठाम असलेला व एक दिवस लहानपणापासूनच लाल दिव्याच्या गाडीत फिरेल असं स्वप्न मनाशी बाळगून चिकाटीने अभ्यास करून मनात ठरवल्याप्रमाणे यश संपादन केलेले आहे अशा तेजस यास किरण सोसायटी ,काझी नगर तसेच संपूर्ण मित्रपरिवार यांच्यातर्फे त्याचे व त्याला नेहमी पाठबळ देणारे त्याचे आई-वडील गुरुजन यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन होत असून नगरसेवक सौ सुलोचनाबाई साळुंके व आबा साळुंखे आणि संपूर्ण मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Tags
news



