अंडी हे निसर्गातील सर्वोत्तम पोषण! डॉ. संजय विसावे : जागतिक अंडी दिनानिमित्त कार्यक्रम



        धुळे, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : अंडी हे निसर्गाने दिलेले सर्वोत्तम पोषण असून ते सहजरीत्या उपलब्ध होते. एवढेच नव्हे, तर ते नैसर्गिकरीत्या बंद आहे. त्यामुळे त्याच्यात भेसळ होवू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे यांनी केले.
जागतिक अंडी दिवसानिमित्त जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, धुळे, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, धुळे व कैलास पोल्ट्री फार्म, मुकटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दुपारी ‘आहारातील अंड्यांचे महत्व’ या विषयावर कार्यक्रमाचे वार येथील केंद्रीय माध्यमिक आश्रमशाळा, मोराणे येथील श्री संस्कार मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. विसावे बोलत होते. सहाय्यक आयुक्त डॉ. अशोक वाडिले, डॉ. योगेश महाले, डॉ. भूषण वाकडे आदी उपस्थित होते.
डॉ. विसावे म्हणाले, अंड्यांमधील प्रथिने हे अति उच्च दर्जाचे असून ते सहज पचणारे आहेत. ते सर्व वयोगटासाठी चांगले आहे. अंडी विविधोपयोगी अन्न पदार्थ असून त्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून आहरात वापरण्यात येतो. डॉ. महाले म्हणाले, अंड्यांमध्ये अ, ब, ड, ई या जीवनसत्वांसह सात प्रकारच्या ऑक्सिडीकरण प्रतिबंधक घटकांचा एकत्रित साठा असतो. अन्य कोणत्याही अन्नापेक्षा यामध्ये नैसर्गिक मूल्ये सर्वाधिक 96 आहेत. त्यामुळे दृष्टी चांगली राहते. हाडे मजबूत होतात आणि हृदय विकाराचा धोका कमी होतो. अंड्यांमुळे मोतिबिंदू व वाढत्या वयामुळे येणाऱ्या स्नायूच्या आजारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे प्रत्येकाने नियमितपणे अंडी खावीत, असेही त्यांनी सांगितले.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने