जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळेत बदल



धुळे, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा नियोजन समितीची बैठक 11 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात होणार आहे. या बैठकीच्या वेळेत बदल झाला असून बैठक आता दुपारी एक ऐवजी याच दिवशी सायंकाळी पाचला होईल. या बदलाची नोंद संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांनी घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी कळविले आहे. 
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या 3 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे व इतिवृत्ताच्या अनुपालनास मान्यता देणे, 31 मार्च 2021 अखेरील जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) खर्चास मान्यता देणे, 30 सप्टेंबर 2021 अखेर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2020- 21 अंतर्गत कोविड- 19 वरील आवश्यक उपाययोजनांचा आज अखेर करण्यात आलेल्या पुनर्विनियोजनास मान्यता देणे, मा. अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा होईल, असेही जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी म्हटले आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने