तळेगाव वणीमधील अवैध धंदे बंद करा आबेङकर राईट पॅथर्स ची मागणी नाशिक शांताराम दुनबळे.




 नाशिक  शांताराम दुनबळे. 

 नाशिक-:दिङोरी तालुक्यातील तळेगाव वणी या गावामध्ये देशी व विदेशी दारु सह अवैद्य धंद्याचा सुळसुळाट झाला आहे   बेकायदेशीरपणे अवैद्य धंदे व दारू विर्क्री करून गोरगरिबांच्या  आया_बहीणींच्या संसाराची राखरांगोळी करणार्या दारु विक्री करणाऱ्या दारु माफियांचा त्वरीत  बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन वणी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजपुत साहेब यांना आंबेडकराईट पँथर्स आँफ इंडिया च्या वतीने   महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासभाई पगारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले त्यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गांगुर्डे, विमलबाई गांगोडे, भारती चतुर, वंदना मोरे, विमलबाई कांबडे,मंगला भोये, विमलबाई चतुर,गजाबाई डंबाळे, इत्यादी सह महीला उपस्थित होत्या वणी पोलिस स्टेशन चे निरीक्षक राजपुत साहेबांनी त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने