शहादा(प्रतिनिधी) : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमानुसार रिक्त नंदुरबार व शहादा पंचायत समितीचे उपसभापती पद भरणे आवश्यक आहे. त्यासाठी २४ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पिठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार पंचायत समितीसाठी तहसीलदार नंदुरबार हे पिठासीन अधिकारी असतील. त्यांना गटविकास अधिकारी, नंदुरबार सहायक करतील. शहादा पंचायत समितीसाठी तहसीलदार शहादा हे पिठासन अधिकारी असतील. त्यांना गट विकास अधिकारी शहादा सहायक करतील. याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
Tags
news
