शहादा (प्रतिनिधी) :- येथील अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती स्वर्गीय ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तोरणामाळ येथील शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रा. प्रदीप पाटील यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून प्रदीप पाटील यांनी अभिवादन केले. प्रदीप पाटील यांनी वाचनाचे महत्त्व आणि वाचनाने व्यक्ती चांगला घडतो म्हणून वाचन प्रसार झाला पाहिजे.या साठी वाचनालय समृद्ध झाले पाहिजे. असे प्रतिपादन केले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी, उपाध्यक्ष शिवपाल जांगिड, सचिव प्रा. संपत कोठारी, विश्वस्त के. के. सोनार, एड गोविंद पाटील,नरोत्तम पाटील, चतुर पाटील, आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थितांनी देखील अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जेष्ठ वाचकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत कोठारी यांनी केले तर आभार शिवपाल जांगडे यांनी मानले.
Tags
news
