शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील कळंबू, असलोद, मलोनी, आणि अनरद येथील ग्रामपंचायत येथे माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये, माहिती मिळण्याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ता राजेश्वर सामुद्रे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केले होते. प्रथम अपील विहित वेळेत माहिती न देणाऱ्या जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक बी.बी.देसले (कळंबू ग्रामपंचायत), महेश पाटील (असलोद ग्रामपंचायत), रिना वळवी (अनरद ग्रामपंचायत), नितीन पानपाटील (मलोनी ग्रामपंचायत), ए.सी. लामगे (मलोनी ग्रामपंचायत) यांच्यावर द्वितीय अपिलात राज्य माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी शास्तीची कार्यवाहीचे आदेश दिले आहे. यांनी एकाच वेळी पाच ग्रामसेवकांवर दंडात्मक कारवाई झाल्याने परिसरात सर्वत्र चर्चा सुरु आहे. शहादा तालुक्यातील ३ ग्रामसेवकांवर प्रत्येकी ५ हजार आणि २ ग्रामसेवकांवर प्रत्येकी २ हजार ५०० रु. शास्तीची कार्यवाही राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ नाशिक यांनी केली आहे.
राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, जनमाहिती अधिकारी यांच्या प्रमाणेच प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या वर देखील कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा, कारण एकही प्रथम अपिलाची सुनावणी माहिती अधिकारच्या नियमात घेतली गेली नव्हती, म्हणूनच अशा या जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांना अभय देण्याचे काम प्रथम अपिलीय अधिकारी देत असतात. आणि जनमाहिती अधिकारी माहिती अधिकाराच्या अर्जाला महत्व देत नाही, म्हणून माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत नाही. यांच्यावर झालेल्या कारवाईचे मी स्वागत करतो असे माहिती अधिकार कार्यकर्ता राजेश्वर सामुद्रे यांनी सांगितले.
Tags
news
