रा.स्व. संघ तर्फे विजयादशमी उत्सव व शास्त्र पूजन संपन्न
संघाची १९२५ साली स्थापना होऊन आज ९६ वर्ष पूर्ण झाले आहेत
शहादा (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी दरवर्षी विजयादशमी निमित्त संचालन बौद्धिक व शास्त्र पूजन करण्यात येते या वर्षीसुद्धा दिनांक १५ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी अन्नपूर्णा लॉन, शहादा येथे विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी माननीय तालुका संघचालक डॉक्टर हेमंत सोनी , प्रमुख वक्ते म्हणून नारोत्तम पटेल उपस्थित होते. सर्व प्रथम सघोष ध्वजारोहन करण्यात आले नंतर हेमंत सोनी व नारोत्तम पटेल यांनी शस्त्र पूजन संपन्न केले त्यानंतर सांघिक गीत वैयक्तिक गीत अमृत-वचन सुभाषित वैयक्तिक गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी नरोत्तम पटेल म्हणाले की डॉक्टर हेडगेवार यांनी १० स्वयंसेवकांना घेऊन सुरू झालेला संघ हा ९६ वर्षाचा झाला आज खेड्यापाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा व त्यांची सेवा कार्य पोहोचले आहेत १९२५ रोजी लावलेला रोपाचे आज वटवृक्ष पेक्षा मोठ्या स्वरुपात रुपांतर झालेले आज सर्वांना दिसत आहे. संघ शाखा ही समाजाच्या हितासाठी आहे. संघाचा शाखेत, शिस्त ,संस्कार समाजसेवा, त्याग ,समर्पण, हे शिकवले जाते .
संघाची शाखा ही प्रत्येक गावात खेड्यापाड्यात शहरातील प्रत्येक चौकाचौकात वस्तीत भागात सुरू झाली पाहिजे.
देशावर ज्या ज्या वेळी संकट आले आहे त्या त्यावेळी संघ स्वयंसेवकांनी कोणते हित न पाहता सहकार्य केले आहे. रस्त्यावर उतरून ग्राउंड लेव्हल वर कार्य फक्त संघस्वयंसेवक करू शकतो , गेल्या दोन वर्षापासून जग हे वैश्विक संकट कोरोना च्या कहर मध्ये सापडले आहे त्यात विविध, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमाला खीळ बसली होती त्यात सुद्धा संघ स्वयंसेवकांनी जीवाची परवा न करता नागरिकांना मदत केली आहे संकटात जातिभेद धर्मभेद शिकवला जात नाही असे नरोत्तम पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी शहरातील नामांकित ठिकाणावर सघोष वाद्य सहित संचलन काढत असतो पण ह्यावर्शी पोलिसांना आणि नागरिकांना कोरोनाह्या महामारीची सुरक्षा ठेवून संचालन हे पोलिसांच्या प्रशासनच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आले व जागेवरच घोष वादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास स्वयंसेवक अजय शर्मा, हिरालाल बोरदेकर, डॉक्टर योगेश चौधरी, उद्योजक अजय गोयल , डॉक्टर वसंत पाटील, रा स्व संघ जिल्हा मंडळ सदस्य संजय कासदेकर, तालुका कार्यवाह मनिष चौधरी, शहर कार्यवाह गणेश धाकड, स्वप्नील जैन, शहादा तालुका प्रचारक देवेन चौधरी , संकेत पाटील, गोविंदा जोहरी, शिवम सोनार, गुंजन सोनार, राजा साळी , वैभव तांबोळी ,भूपेंद्र चौधरी, ललित पाटील , प्रीतम निकम , योगेश अहिरे , पृथ्वीराज रावल व १३६ प्रमुख स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते.
Tags
news
