मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्था धुळे तर्फे धम्म चक्र प्रर्वतन दिवस व वाचन प्रेरणा दिवस भव्य स्वरूपात साजरा




धुळे शहरात आकाशवाणी परिसरात असलेल्या मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्था धुळे तर्फे दि.15 ऑक्टोबर 2021 रोजी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर धम्मचक्र प्रवर्तन दिवस व माजी राष्ट्रपती डाॅ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. संस्थेच्या अध्यक्ष मोनिका अशोक शिंपी यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन सर्व उपस्थितांनी अभिवादन केले.
 यावेळी बोलतांना मोनिका शिंपी म्हणाल्या की ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून देश पुढे गेला आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने निर्माण झालेल्या भारतीय राज्यघटनेमुळे बहुजन शोषित घटकाला व विशेषत: स्त्रीयांना आत्मसन्मान मिळाला. सर्वांना समान अधिकार   प्राप्त झाला.देशाला पुढे नेण्यासाठी या महामानवांनी अथक परिश्रमाने निर्माण केलेले कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.याप्रसंगी मुलांना पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील विशेष अतिथी सौ.उमा खैरनार जोशिला सोनवणे निर्मला बाविस्कर शितल बाविस्कर उषा वाणी हर्षदा बाविस्कर सुरेश सोनवणे प्रेम चव्हाण संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांना खिरदान करुन कार्यक्रम संपन्न झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने