भुसावळ -नियतीने कोणत्याही कार्यक्रमात सर्वांच्यासमोर बसण्याचे भाग्य /फळ मला मिळते मात्र शालेय जीवनात शेवटच्या कोपऱ्याच्या बेंचवर बसणारा मी अध्यात्मिक क्षेत्रात रममान होत गेलो परमेश्वराच्या कृपेने व समाजसेवेचे व्रत यामधूनच माझ्याकडून माणसाला माणसाशी जोडण्याचे कार्य होत आहे आपणही मानवाला मानवाशी जोडून माणुसकीची पात्रता निर्माण करा ते जोपासा तुम्ही सर्वांच्या पुढे राहाल असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी केले .
शैक्षिक आगाज भारत ,महाराष्ट्र विभाग तर्फे 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 5 ऑक्टोंबर जागतिक शिक्षक दिन निमित्त जाहीर झालेल्या स्मार्ट ऑफिसर ,स्मार्ट टीचर, स्मार्ट रिफॉर्मर व पर्यावरण मित्र पुरस्कार वितरण यावेळी करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर रानमळा पॅटर्न चे प्रणेते पोपट तुकाराम शिंदे पुणे ,अमरावती जळगाव पुणे याठिकाणी असलेल्या विद्यापीठाच्या नियोजन अभ्यासमंडळ असणारे माजी प्राचार्य म ल नानकर, ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहन भाऊ फालक ,चेअरमन महेश भाऊ फालक ,संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र (सोनुभाऊ) मांडे हे उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करूनवृक्ष पूजा करण्यात आली त्यानंतर प्रमुख वक्ते रानमळा पॅटर्न चे प्रणेते पोपट तुकाराम शिंदे यांनी पर्यावरण शिक्षण यांना जोड देत असताना बहिणाबाईच्या छोट्या छोट्या तत्वज्ञानात खूप मोठा आशय कसा भरला आहे आजच्या समस्या निर्माण झाल्या त्यांनी त्या काळात या काव्यातून मांडलेल्या आहेत एक अशिक्षित स्त्री पण एका विद्यापीठाला तिचे नाव आहे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी बहिणाबाई प्रमाणे आपणही कार्य करा एक शिक्षक काय परिवर्तन करू शकतो त्यांच्या गावाने जी आर काढला जातो रानमळा पॅटर्नआपण ही येऊन बघा आणि शिक्षक असे परिवर्तन करू शकतो हे दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले
त्यानंतर माजी प्राचार्य व विविध विद्यापीठावर कार्यरत असणारे म. ल. नानकर यांनी यांनी गणित निरस सारखा विषय किती सहज सोपा आहे त्याची उदाहरणे देऊन ते पुढे म्हणाले जीवनात अनेक संघर्ष येतात आणि जातात पण न डगमगता त्यातून मार्ग काढत राहणे एक जीवन आहे आपण सर्व अशा वाटेवरचे आहोत
आपल्याला तो पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे आपल्यावर अधिक जबाबदारी वाढली आहे आपण सर्व त्या जबाबदारीचे भान ठेवाल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
खालील प्रमाणे विविध स्वरूपाचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले
*स्मार्ट रिफॉर्मर पुरस्कार*
मोहन भाऊ फालक अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी ,महेश भाऊ फालक चेअरमन ,सोनुभाऊ मांडे अध्यक्ष संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ
*स्मार्ट ऑफिसर पुरस्कार*
प्राचार्या मीनाक्षी वायकोळे भुसावळ
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण जळगाव
प्राथमिक शिक्षणाधिकारी एस जी निर्मळे धुळे, डॉक्टर डी बी साळुंखे डायट जळगाव प्राचार्य डॉ.अनिल झोपे डायट जळगाव डॉ. सी डी साळुंखे डायट जळगाव प्राचार्य डीडी सूर्यवंशी डायट संगमनेर ,डॉ. विजय गायकवाड डायट सातारा ,डॉ. जगन्नाथ दरंदले डायट नासिक, डॉ. गणेश मोरे संगमनेर, तुषार प्रधान गटशिक्षणाधिकारी भुसावळ, सिद्धार्थ नगराळे गटशिक्षणाधिकारी शिंदखेडा, विजय पवार गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर ,रागिनी चव्हाण शिक्षण विस्तार अधिकरी जळगाव ,शैलेश पाटील डाएट जळगाव,
*स्मार्ट टीचर पुरस्कार*
सुवर्णा कुलकर्णी बुलढाणा ,रंगनाथ शिंदे नांदेड ,दत्तात्रय गिरी लातूर ,दिनेश भारोटे नंदुरबार ,रुपेश चौधरी नंदुरबार ,भाग्यश्री चौधरी नाशिक ,नामदेव महाजन भुसावळ, गिरीश भंगाळे खानापूर ,अर्जुन साळुंखे रावेर, महेश पाटील पारोळा, सुनील मोरे सिंदखेडा ,पिंटू म्हैसनवाड परतुर ,लक्ष्मीकांत ईडलवार नायगाव जामखेड,यमुना निखलस मलकापूर, भानुप्रिया मेथा रायगड, वैशाली राऊळ नांदेड , शेख सिराज मोहम्मद बीड, राजन गरुड पालघर ,सुचिता सपकाळ ठाणे , रुकसाना अब्दुल नासिक, माधुरी काकडे दौंड ,सतिष मुंगेकर रत्नागिरी ,कविता मुदखेड नांदेड, लता पाडेकर पुणे ,राहुल चतुर शिरूर ज्ञानेश्वर विजागर सोलापूर ,सिद्धलिंग स्वामी सांगली , संजीव ढवळे धुळे, भूपेंद्र दादा पाटील भुसावळ
*पर्यावरण मित्र पुरस्कार*
रघुनाथ आप्पा सोनवणे ,सुरेंद्र सिंग पाटील ,अलका भटकर, निशांत पाटील, संदीप पाटील भुसावळ, मनीषा किशोर पाटील जळगाव, नयना पाटील रावेर, ज्योती राणे जळगाव, शारदा उंबरकर अंमळनेर, दीपा गिरी नांदेड, सुमन जिरोणेकर नांदेड.
*शिक्षा सारथी पुरस्कार*
हा आंतरराष्ट्रीय माँरिशस वरून दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्रातून नाना पाटील सर भुसावळ यांना मान्यवराच्य हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा कुलकर्णी बुलढाणा सूत्रसंचालन ज्योती राणे जळगाव तर आभार शैक्षिक आगाज राज्य समन्वयक नाना पाटील सर यांनी केले
या कार्यक्रमात पंचावन्न पारितोषिके विविध स्वरूपाची देण्यात आले महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून पुरस्कार्थी आलेले होते या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ सोनवणे सुरेंद्र पाटील भूपेंद्र दादा पाटील तुषार महाजन चेतन पाटील निशांत पाटील मनोज खडसे शारदा उंबरकर गिरीश भंगाळे ज्योती राणे संजीव ढवळेयांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन नियोजन शैक्षिक आगाज चे राज्य समन्वयक नाना पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमने करण्यात आली
Tags
news
