डायटचे प्राचार्य डॉ अनिल झोपे व ज्येष्ठ अधिव्याख्याता डाँ. सी डी साळुंखे यांना स्मार्ट ऑफीसर पुरस्कार




भुसावळ- जळगाव येथील डायटचे प्राचार्य डॉ अनिल झोपे व ज्येष्ठ अधिव्याख्याता डाँ. सी डी सांळुखे यांना नुकताच शैक्षिक आगाज भारत तर्फे देण्यात आलेला स्मार्ट ऑफिसर हा गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक नाना पाटील सर भुसावळ यांनी डायट च्या कार्यालयात जाऊन प्राचार्य डॉ अनिल झोपे व ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ सी डी साळुंखे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी शैक्षिक आगाज भारत या राष्ट्रीय संस्थेविषयी शिक्षण संदर्भामध्ये कशा स्वरूपात कार्य केले जाते याची माहिती या प्रसंगी नाना पाटील यांनी दिली  यावेळी डायट चे प्राचार्य डॉ अनिल झोपे यांनी शिक्षणात होत असणारा अमुलाग्र बदल आपण सगळ्यांनी तो स्वीकारला पाहिजे आणि बदलत्या काळानुसार आपणही बदलते शिक्षण स्वरूप अंगीकारायला हवे त्याचप्रमाणे शिक्षणात येणारे नवनवी आव्हाने ती आव्हाने नसून संधी समजून कार्य केले तर यश निश्चित मिळते आणि कार्य करण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळते . शैक्षिक आगाज भारत या संस्थेने आमच्या डायट कार्यातील डॉ ज्येष्ठ अधिव्याख्याता अण्णासाहेब डी बी साळुंखे अधिव्याख्याता बापूसाहेब सि.डी साळुंखे अधिव्याख्याता शैलेश पाटील आणि माझ्यासह सर्वांना स्मार्ट ऑफिसर पुरस्काराने गौरव  केल्याने आणि नकळतपणे आम्हाला पुरस्कार मिळाल्याने कार्य करण्यास अधिक  उमंग उत्साह निर्माण झाला शैक्षिक आगाज भारत ला यानिमित्ताने धन्यवाद दिले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी केले ज्येष्ठ अधिव्याख्याता डी बी साळुंके यांनी आभार मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने