शिरपूर प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करू नये व त्यांना वीज बिल भरण्यात सवलत द्यावी यासाठी आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निवेदन सादर केले आहे
सदर निवेदनात शेतकऱ्यांनी असे नमूद केले आहे की तालुक्यातील भोरखेडा येथील शेतकऱ्यांनी वीज मंडळांच्या अधिकाऱ्यांसोबत मध्ये झालेल्या चर्चेनुसार मान्य करण्यात आलेले पाच हजार रुपये चे वीज बिल मार्च 2019 पर्यंत भरण्यास मुभा देण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांनी सदरची विज बिल भरले आहेत मात्र आता बिलांसाठी वीज मंडळाने कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत मात्र दीपावली तोंडावर असताना शेतकऱ्यांची दीपावली अंधारात जाऊ नये म्हणून खंडीत करण्याचे आदेश मागे घेण्यात यावे व शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आले आहे
सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अडचणीची असून रेडमी झाल्यानंतर पेरणी झाल्यानंतर पाऊस दोन-तीन महिने उशिरा आला त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला अनेकांना दुबार पेरणी करावी लागली त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे ट्यूबवेल मुळे थोड्याफार प्रमाणात कापसाचे पीक वाचले मात्र यानंतर आलेल्या पावसाने पंचम नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास देतील हिरावला गेला आहे शिवाय बोंड आळी मुळे देखील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे उत्पन्नात फरक पडून फक्त 20 टक्के उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले आहे शिवाय पुढील रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना खते यासाठीदेखील पैशांची गरज आहे एकंदरीत तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत असताना वीज मंडळाने काढलेला सुलतानी आदेश शेतकऱ्यांवर अडचण निर्माण करू शकतो म्हणून वीज मंडळाने दीपावलीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करू नये अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे सदरच्या निवेदनावर भोरखेडा व परिसरातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत यावेळेस हिंमतसिंह उमेदसिंह राजपूत तसेच भारतीय जनता पार्टी चे तालुका उपाध्यक्ष सोनू भाऊ राजपूत ,
दरबार सिंग राजपूत ,बटेसिंग राजपूत, उज्वल गिरासे ,योगेंद्र जमादार, भगवान मोरे, नथुसिंग जमादार ,भालेराव भिल, राजेंद्र राजपूत, संग्राम राजपूत ,राजेंद्र राजपूत ,सुरेंद्र राजपूत इत्यादी
व भोरखेडा गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news



