पिंप्रीच्या सरपंचपदी महेंद्र गिरासे तर उपसरपंचपदी काशिनाथ भिल यांची बिनविरोध निवड! पंचेचाळीस वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आजही कायम




*शिरपुर जि. धुळे (प्रतिनिधी) : पिंप्री ता. शिरपुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेंद्र एकनाथ गिरासे तर उपसरपंचपदी काशिनाथ दला भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


        पिंप्री येथील लाेकनियुक्त सरपंच प्रविण राजपूत व उपसरपंच कमलबाई काेळी यांनी गावाची अखंड पंचेचाळीस वर्षापासून चालत आलेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम करण्यासाठी अडीच वर्षानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला.  त्यामुळे रिक्त झालेल्या दाेन्ही जागेसाठी आज दि. २९ रोजी सरपंच, उपसरपंच यांच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय पिंप्री येथे सकाळी ९:३० वाजता विशेष बैठक घेण्यात आली. 
    यावेळी सरपंच पदासाठी महेंद्र गिरासे व उपसरपंच पदासाठी काशिनाथ भिल यांचा प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने सरपंचपदी महेंद्र गिरासे, उपसरपंचपदी काशिनाथ भिल यांची बिनविरोध निवड झाली.              ग्रामपंचायत सदस्य संजय धनगर, इंदुबाई राजपूत, कमलबाई काेळी, वंदनाबाई गिरासे, आरती भिल उपस्थित हाेते. तर तलाठी एन. एस. पटेल, ग्रामसेवक पी. पी. भामरे, पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले. 


    नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा माजी सरपंच प्रविण राजपूत, पंचायत समिती सदस्य विजय खैरनार, पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, माजी सरपंच संजय धनगर, साेसायटी चेअरमन आर.डी.पाटील, माजी सरपंच वासुदेव गिरासे, श्री.राेहीत गिरासे, माजी उपसरपंच किशोर पाटील, संजय काेळी, रणजित गिरासे, पंडीत पाटील, लालसिंग धनगर, भुरा गिरासे, भिका काेळी, याेगेंद्र गिरासे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष मनाेज राजपूत, श्री. राजपूत करणी सेना शिरपुर तालुका अध्यक्ष अनिल गिरासे आदींनी सत्कार केला. 


 तर निवडणूक बिनविरोध झाल्याने माजी मंत्री, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जि. प.अध्यक्ष तुषार रंधे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने