तालुक्यातील उर्मदा शिवारातील गांजा शेती वर तालुका पोलिसांची कारवाई





शिरपूर - दिनांक २९/१०/२०२१ रोजी शिरपुर तालुका पोलीस स्टेशन हददीतील उर्मदा गावाचे शिवारात इसम नामे दुनीलाल गोटा पावरा हा त्याचे शेतात गांज्यासदृश अंमलीपदार्थाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केलेली आहे अशी सपोनि/सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या बातमीवरुन शिरपुर तालुका पो.स्टे अधिकारी व कर्मचारी याचे पथक तयार करण्यात आले. सदर ठिकाण हे दुर्गम भागात असल्याने तेथे काही अंतर पायी जावे लागले असुन सदरचे ठिकाण हे उर्मदा गावाचे दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर असलेल्या लहान नाल्या जवळ असलेल्या शेतात होते. सदर ठिकाणी सांयकाळी ०४.०० वाजेच्या सुमारास पोहचले असता तेथे शेतात गांजा सदृश्य अंमलीपदार्थाच्या झांडाची लागवड केलेली दिसुन आल्याने सदर शेतावर कारवाई करुन शेतातुन खालील प्रमाणे मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.


३७०,००० / -रुपये कि.चा एकुण १८५ किलो ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमंली पदार्थाचे वनस्पतीचे हिरवे ओले ताजे झाडे, पाने व फांदया असलेले मुळांसह, मुळा पासुन ते शेंडया पर्यत उंची अंदाजे ३ ते ५ फुटापर्यंत कमी अधिक उंचीचे असलेले


सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रविणकुमार पाटील सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत बच्छाव सो. व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर श्री. अनिल माने सो. यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पो.स्टे. चे सपोनि/सुरेश शिरसाठ, पोसई/भिकाजी पाटील असई/ लक्ष्मण गवळी, असई नियाज शेख पोहेकॉ १२२ माळी पोहेकॉ ८९९ मांडगे, पोहेकॉ ४०४ धनगर, पोना, अनिल चौधरी, योगेश मोरे, मुकेश पावरा, क, ष्णा पावरा, चालक पोहेकॉ/सईद शेख, मनोज पाटील, जयेश मोरे अशांनी केली आहे. असुन वरील प्रमाणे माल हस्तगत करण्यात आला आला आहे. सदर वनजमीन ही दुनीलाल गोटा पावरा रा. उर्मदा याच्या मालकीची असल्याचे समजल्याने नमुद इसमाविरुध्द पोहेकॉ राजेंद्र मांडगे यांचे फिर्यादीवरुन एनडीपीएस कायदा कलम २० व २२ प्रमाणे शिरपुर तालुका पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई भिकाजी पाटील हे करीत आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने