शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मातोश्री श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल (मम्मीजी) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी गुरुवारी दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता शिरपूर येथे जनक व्हीला निवासस्थानी वृद्धापकाळाने देहावसान झाले.
गुरुवारी दि. 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता शिरपूर शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल व परिवारातील सदस्य यांनी मातोश्री श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल (मम्मीजी) यांना मुखाग्नी दिला. शिरपूर शहर, तालुक्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यासह मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश व परिसरातून आलेल्या असंख्य नातेवाईक, नागरिक यांच्या उपस्थितीत मम्मीजी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा व परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अंत्यसंस्कार प्रसंगी अतिशय भावनिक वातावरणात साश्रुनायनांनी शेवटचा निरोप देण्यात आला. सुरुवातीला जनक व्हीला निवासस्थानी परिवाराने मम्मीजी यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर तेथून शहरातील अमरधाम पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.
Tags
news
