दोंडाईचा जेष्ठ नागरिक संघात, कायदे विषयक जनजागृती शिवीर संपन्न.




वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
दोंडाईचा - जिल्हा विधी सेवा प्राधीकरण धुळे यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती अभियानातंर्गत, दोंडाईचा वकील संघाच्या पुढाकाराने, दोंडाईचा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.पी. गिरासे यांच्या अध्यक्षते खाली कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.सदर शिबीरात अँड.आयाचित, अँड. मराठे, अँड माणिक,, अँड.भोई. आणि कार्यालयीन अधिक्षक एस.व्ही. पगारे यांनी जेष्ठांसाठी असलेले केंद्र आणि राज्य सरकारच्या विवीध कायद्यांवर सविस्तर आणि तपशीलवार माहिती, जेष्ठांना समजेल अश्या सोप्या भाषेत व्याख्याना व्दारे पटवून दिली. तसेच जेष्ठांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निराकरण जेष्ठांना आकलन होईल



अश्या पद्धतीने केले. रावल मोठ्या, 'सदर शिबीरात मोठ्या संख्येने, "दादासाहेब जेष्ठ नागरिक संघाचे" पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. उपस्थित जेष्ठांनी सक्रिय सहभाग नोंदविला आणि समाधान व्यक्त केले.

'शिबीराचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ.एस.पी.गिरासे यांनी अध्यक्षीय भाषणात, दोंडाईचा वकील संघाने जेष्ठांच्या लहान-मोठ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र . जेष्ठ नागरिकासाठी कक्ष किंवा मंच निर्माण करावा.आणि महीन्याच्या एखाद्या सोयीच्या दिवशी विशिष्ट वेळेत जेष्ठांच्या तक्रारी सामोपचाराने सोडवण्यासाठी वकील संघाने विना मोबदला सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.शिबीराचे सुत्रसंचलन अँड.मराठे यांनी केले. रावल जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सचिव श्री.सुरेशराव ढोमन पाटील आणि वकील संघाच्या वतीने श्री.एस.व्ही पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.राष्ट्र गिताने शिबिराची समाप्ती झाली.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने