बाफना इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स चे भव्य दालनाचा शिरपुरात शुभारंभ



शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यात बाफना ब्रदर्स तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ग्राहकांच्या सेवेसाठी शिरपूर शहरात बाफना इलेक्ट्रॉनिक्स म्हणून भव्य दालनाच्या शुभारंभ  दिनांक 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या वेळी आ. श्री कांशीरामजी पावरा,तुषारभाऊ रंध्ये, बबनभाऊ चौधरी, सभापती सत्तार दादा,किशोर माळी  ता. अध्यक्ष, भाजप, छगंनलालजी बाफना,धनराजजी बाफना, दिलीपजी बाफना,सुनीलजी बाफना, अशोक बाफना,विजय बाफना बोराडीवाले,कैलास बाफना, राकेश बाफना,रोनक बाफना. व इतर सामाजिक व राजकीय सर्वातून मान्यवर उपस्थित होते.
 सूत्र संचालन श्री मनोहर वाघ सर यांनी केले



 शिरपूर शहरात बाफना परिवाराच्या बाफना मेडिकल च्या  सेवेला 24 वर्ष पूर्ण झाले असून ग्राहकांची अमूल्य प्रेम व आशीर्वादाच्या बळावर बाफना ब्रदर्स शिरपूर शहरात भव्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनाचा शुभारंभ केला आहे. सदरच्या दालनात इलेक्ट्रॉनिक्स या सर्वच गृह उपयोगी वस्तू या एकाच छताखाली उपलब्ध होणार असून टी .व्ही.  वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर ,इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट ,वॉटर प्युरिफायर व इतर असंख्य वस्तू या नामांकित कंपनी सॅमसंग, एलजी, हायर ,लॉयड, सोनी, वोल्टास ,टाटा, बजाज, बॉस्को, आयफबी इत्यादी नामांकित कंपनीचे वस्तू येथे उपलब्ध होणार आहे.
 सदरचे दालन शिरपूर शहरातील करवंद नाका जवळ सेंट्रल बँकेच्या शेजारी शहादा रोड शिरपूर येथे सुरू करण्यात येत असून ग्राहकांनी आमच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक अशोक बाफना व राकेश बाफना यांनी केले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने