थाळनेर ता शिरपूर येथे डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव येथील कृषिदूत निलेश सिताराम देवरे याने आपल्या RAWE ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना इ- पीक पाहणी या अँप्स वर ऑनलाइन पीक पेरे कसे नोंदवावे या बद्दल मार्गदर्शन केले व काही शेतकऱ्यांचे पीक पेरे नोंदणी देखील करून दिले.
यामध्ये त्यानी ऑनलाइन पीक पेरा नोंदताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व शेतकऱ्यांच्या समस्या,शंकाचे निरसन केले.हा कार्यक्रम राबवत असतांना त्यांना डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे सर,प्रवीण देवरे सर,कार्यक्रम समन्वयक ए.डी. फापळे सर,कार्यक्रम अधिकारी व्ही. एस. राणे मॅडम व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले.


