थाळनेर पोलीस अधिकाऱ्यांचा बभळाजच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन



बभळाज / प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील बभळाज येथे थाळनेर पोलीस स्टेशनचे सपोनि उमेश बोरसे, पीएसआय कृष्णा पाटील व पीएसआय मनोज कुंवर यांच्या कडून बभळाज येथील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात आले.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बभळाज येथील सभागृहात, गावातील युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. बभळाज चे माहेर असलेल्या सौ.मोहीनी जाधव (सहाय्यक क्षेत्र अधिकारी, जळगाव) उपस्थित होत्या.                                      
  शिबीराचे मार्गदर्शक सपोनि उमेशबोरसे, पीएसआय कृष्णा पाटील, पीएसआय मनोज कुंवर यांचे  गावातील तरुणांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी या सर्व प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धा परीक्षा व करिअर बद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या व परिक्षांबाबत असलेले मनातील प्रश्न या सर्वांची उत्तरे उमेश बोरसे, कृष्णा पाटील, मनोज कुवर यांनी स्वताचा अनुभव देत देऊन अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय जाधव यांनी केले तर गावाचे पोलिस पाटील नितीन जाधव,नरेश राठोड, राज जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.*        
  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशांत राठोड,अविनाश शिंदे,धर्मराज राठोड,सागर राजपुत,अक्षय जाधव,राहुल पाटील,  ग्रा.पं.कर्मचारी व गावातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले,मान्यवरांनी आपला वेळ देऊन गावातील होतकरु मुलांना मार्गदर्शन केल्या बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने