मुंबई - राज्यात काही दिवसांपासून मुंबई येथील क्रूज प्रकरणावरून रणकंदन माजले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोज सोशल मीडिया आणि वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सुरू आहेत. यात आजवर कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेल्या समीर वानखेडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे . वानखेडे हे भाजपचा पोपट असल्याच्या देखील आरोप होत आहे.
दरम्यान मुंबई क्रूज प्रकरणातील प्रकरणात काल मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आता न्यायालयाच्या बाहेर हा वाद अधिक जोमाने पेटणार अशी चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एन. सी .बी .च्या कार्यालयांच्या बाबत अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून त्यांच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवाय विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबाबत देखील त्यांनी अनेक आरोप लावले असून या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे.
आज नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन क्रूझ वरील पार्टी आयोजित करणारा तो दाढीवाला म्हणजे काशीद खान असून काशीद खान हा फॅशन टीव्ही च्या इंडिया हेड असून त्याचे मूळ धंदे ड्रग्स तस्करी व सेक्स रॅकेट चालवणे असे आहेत. कासिम खान आणि समीर वानखेडे यांचे जवळचे संबंध आहेत असा देखील दावा त्यांनी केला आहे. जर एनसीबी मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांना पकडते तर मग महिनाभर आधी नियोजित पार्टीच्या ऑर्गनायझर ला का सोडून देण्यात आले? जर क्रूज वर पार्टीचे आयोजन केले होते तर मग क्रूज वरील 1300 लोकांची चौकशी न करता त्याला का सोडून देण्यात आले? असे आरोप त्यांनी आज केले आहेत.
याशिवाय माझ्या परिवार देखील मागील 70 वर्षांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्राचा रहिवासी आहे मात्र जर कोणी मी मराठी आहे म्हणून मला मदत करा आणि माफ करा असा दावा करत असेल तर तो चुकीचा आहे कोणत्याही आरोपीला जात धर्म प्रांत लागू होत नसून आरोपी हा आरोपी असतो आणि त्याला कायद्याने शिक्षा ही झालीच पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवाय आजच्या पत्रकार परिषदेत 6त्यांनी फार मोठा दावा केला असून पंचक किरण गोसावी यांच्यासोबत काही भाजप नेत्यांची लिंक असून यांना त्यांच्या पितळ मी विधानसभेत उघड करणार आहे. विधानसभेत मी भांडाफोड केल्यानंतर राज्यातील काही भाजप नेत्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला देखील जागा मिळणार नाही असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. सदरची लढाईही कोणतेही जातीपातीची लढाई नसून निरपराध लोकांवर केलेले खोटे गुन्हे व फर्जिवाडा व बोगस बनावट कागदपत्र तयार करून मिळवलेल्या नोकऱ्या यांच्या विरोधात असून जोपर्यंत जात पडताळणी समितीतर्फे समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला बोगस ठरून त्यांची नोकरी जात नाही त्यांना न्यायालयीन शिक्षा होत नाही व निरपराध लोकांना या खोट्या गुन्हातून मुक्तता होत नाही तोपर्यंत सदरच्या लढा हा असाच सुरू असेल .याबरोबर तेही सांगायला विसरले नाहीत की मी माझ्या आजपर्यंत कोणतेही गैरकृत्य केलेले नाही कोणताही आर्थिक अपहार केलेला नाही आणि गर्वाने सांगतो की हो माझ्या परिवाराच्या धंदा भंगार विकण्याचा आहे आणि एक भंगारवाला काय करू शकतो याची प्रचिती तुम्हास विधानसभेच्या अधिवेशनात येईल असा दावा करून त्यांनी या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढवली असून आगामी विधानसभा लक्षवेधी असेल याची जाणीव करून दिली आहे.
Tags
news





