दोंडाईचा
गावापासुन तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या लाकडापासुन प्लाऊड दरवाजे बनविणाऱ्या मोतील इंडस्ट्रीज कंपनीला भल्या पहाटे आग लागून पंधरा लाखाच्या मशनरीसह,लाकूड व पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले आहे. याबाबत फँक्टरीचे मालक श्री रमेशसेठ रेलूमल कुकरेजा यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशनला अग्नी उपद्रवची तक्रार दिली आहे.
याबाबत दोंडाईचा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,दिनांक २६ आँक्टोबर २०२१ मंगळवार रोजी भल्या पहाटे शहरापासुन चार किलोमीटरवर असलेल्या दोंडाईचा-निमगुळ रस्त्यावर मोतील इंडस्ट्री आहे. ह्याठिकाणी लाकडापासुन प्लाऊड व दरवाजे बनविण्याचे काम चालते. पहाटेच्या वेळी फँक्टरीचे मालक श्री रमेशसेठ कुकरेजा यांचा फोन आला की,साहेब आमच्या निमगुळ रस्त्यावरील प्लाऊडच्या फँक्टरीत दरवाजे बनविल्यावर सुकवण्यासाठी ठेवलेल्या चेंबरला आग लागली आहे व आगीचे स्वरूप रौद्र आहे.
म्हणून आपण तातडीने मदत पाठवावी,असे सांगितले. यावेळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी साहेब यांनी तातडीने घटनास्थळी पोलीस कुमक व दोंडाईचा,शहादा,नंदुरबार येथील फायर फायटर पाठवत सकाळी सात वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आगीत फँक्टरीमधील साडेआठ लाखाचे बाँयलर मशीन, चार लाखाच्या लाकड्याच्या फ्रेम, दीड लाखाची इतर मशनरी तसेच एक लाखाचे पत्र्याचे शेड आदींचे पंधरा लाखाच्या साहित्याचे जळून नुकसान झाले आहे. याबाबत दोंडाईचा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत, पंचनामा करत आहे.
Tags
news



