शिरपूर एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण



शिरपूर प्रतिनिधी राज्यभरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आज पासून आमरण उपोषणास बसले असून शिरपूर शहरातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी यांनीदेखील आज सकाळी दहा वाजेपासून काम बंद आंदोलन करून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे यासाठी संयुक्त कृती समिती स.प. शिरपूर आगार धुळे विभाग यांचे कृती समिती तयार करण्यात आली असून त्याअंतर्गत सदरचे आंदोलन करण्यात येत आहे . या आंदोलनाबाबत सदर कृती समितीने धुळे जिल्हा आगार प्रमुख यांना निवेदन दिले असून सदर निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशनशिरपूर शहर यांना देखील देण्यात आली आहे.


शिरपूर आगारातील सर्व संघटना मिळून कृती समिती तयार करण्यात आली असून कृती समितीमध्ये खालील मुद्यांची सोडवणूक दिवाळी सणापूर्वी व्हावी या कारणास्तव सर्व कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून खालील मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती समिती मार्फत दि. २७/१०/२०२१ पासून शिरपूर आगारात आमरण उपोषण करण्यात येणार असून याची सर्व जबाबदारी रा.प. प्रशासनाची राहील असे नमूद करण्यात आले आहे सदरच्या कृती समितीमध्ये खालील मागण्यापूर्ण मान्य करण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येतआहे.


यात कर्मचाऱ्यांनी १) रा. प. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे.

२) रा. प. महामंडळातील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषित करण्यात यावे.

३) रा.प.कर्मचान्यांना राज्य सरकारी कर्मचान्याप्रमाणे भत्ते व इतर सोयीसुविधा देण्यात याव्या.
 ४) वार्षिक वेतनवाढ ३% व घरभाडे भत्ता ८.१६, २४ टक्के लागू करण्याचे मान्य केले असतांनाही अद्याप दिलेला नाही.
५.) रा.प. कर्मचान्यांना वेतन वेळेवर मिळत नाही.

६) लॉकडोऊन काळातील कोविड भत्ता तात्काळ देण्यात यावा.

(७) अनियमित वेतन वेळेत मिळण्यात यावे व दिवाळी बोनस रू १५००० व १२५०० अग्रीम उचल देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात येत आहे.यात संगटनेचे अध्यक्ष,सचिव,
महाराष्ट्र एस. टी कामगार संघटना, शिरपूर आगार,महाराष्ट्र एस.टीग्रेट शिरपूर आगार
महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना इत्यादींनी सहभाग घेतला आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने