बेमुदत उपोषण येवल्यात कचेरी रोड ते मुक्तीभुमी रस्ता काॅक्रिटीकरण करा, , .बेमुदत उपोषणास प्रारंभ.



                  
नाशिक=येवला शहरात कचेरी रोड भागातील दादा भाई फिटर बीडवाली मशिदी च्या पुढे वाहनारी उघडी गटार पाईप टाकून  बाधण्यात यावी.तर
आईना मशिदीपासून कोर्ट रोड मुक्ती भूमी  ते चोपदार मळ्याच्या  पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणाचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी आज नगर परिषद कार्यालयासमोर  बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित नगरसेवक 
वरील संदर्भित विषयास अनुसार आपले प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी  निवेदन देऊन चर्चा करून खालील विषय गंभीर स्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे त्यावर आपण आश्वासन देऊनही अद्याप पर्यंत अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे कचेरी रोड भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून सदर चे प्रश्न दिनांक 26 ऑक्टोबर 2021 पर्यंत न सुटल्यास दिनांक 27 सप्टेंबर 2021 पासून नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला असून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे 

कचेरी रोड भागातील दादाभाई पीटरच्या घराजवळ बिडवाडी मशिदी पर्यंत वाहणारी उघडी गटारं पाईप टाकून बांधकाम करण्यात यावी  कोर्ट रोड चोपदार मळ्याच्या पुढे मुक्ती भूमी रस्त्याचे तातडीने कॉंक्रिटीकरण करण्यात यावे उर्वरीत कामाला सुरुवात करण्यात येत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे श्री दादा भाई फिटर श्री अकमल शेख श्रीमती सूरैया  शेख श्रीमती शबाना शेख श्री अक्रम अन्सारी श्री अजिज शेख मुमीन अहमद शेख  पञकार संतोष गायकवाड यांनी बोलताना सांगितले.उपोषण बाबद माहिती
 श्री. छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री  अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण ,जिल्हाधिकारी सुरज मांढरे नाशिक,  प्रांत अधिकारी  सोपान कासार येवला, मा तहसिलदार प्रमोद हिले सो.येवला, मा  नगराध्यक्ष  येवला,  माणिकराव शिंदे  येवला मा हुसैन  भाई शेख माजी नगराध्यक्ष.मा पोलीस निरीक्षक येवला पोलीस ठाणे यांना निवेदनाद्वारे माहिती दिली असल्याचे उपोषण कर्ता यांनी दिली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने