शिरपूर - शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे
नगरसेवक हेमंत गुलाबराव पाटील व नगरसेवक सौ संगीता राजेंद्र देवरे यांनी राबवलेल्या मिशन कवच कुंडल अभियानात प्रभागातील नागरिकांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवत कोरीना प्रतीबंधक लस घेऊन प्रभाग क्रमांक 5 हा 100 % लस युक्त झाला आहे .. शहारातील 15 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 5 हा पहिला पूर्ण लसीकरण झालेला प्रभाग झाला आहे .. लसीकरण झाल्यानंतर प्रभागातील घरोघरी जाऊन सर्वे केल्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले .. त्यामुळे शिरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 हा पहिला संपूर्ण लसीकरण युक्त प्रभाग ठरला आहे सरकारचे महत्त्वपूर्ण अभियान कवचकुंडल मिशन अंतर्गत युवा नगरसेवक हेमंत पाटील यांनी या प्रभागात विशेष प्रयत्न करून व नागरिकांशी संपर्क करून करण्याच्या गांभीर्याची जाणीव करून देत नागरिकांना प्रोत्साहित करून लसीकरणा च्या कामावर भर देत नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून देऊन आपल्या प्रभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यामुळे शिरपूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 हा पहिला 100% लसीकरण पूर्ण झालेला प्रभाग म्हणून समोर आला आहे.
Tags
news



