शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात आज अचानक पणे छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या कारवाईत प्रतिबंधित असलेले सुगंधी तंबाखू व गुटखा याची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून त्यास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे .
शहादा शिरपूर कडे अवैध गुटखा घेऊन जाणारे क्रुझर वाहन पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ सापळा रचून जप्त केले व त्यात सुमारे 8 लाख 22 हजार 264 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरच्या मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहादा जिल्हा नंदुरबार येथून शिरपूर गावाकडे क्रुझर वाहन क्रमांक एम एच 18 बीसी 27 17 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सदर वाहन आज पहाटेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाचे चौफुलीवर थांबवले असता यावेळी वाहनावरील चालकास विचारणा केली त्याने त्याचे नाव मनोज बळवंतराव पाटील रा. वाघाडी तालुका शिरपूर असे सांगितले त्यात वाहनातील माल विषयी विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र वाहनातील मालाची तपासणी केली असता वाहनात सुमारे 4 लाख 39 हजार 924 रुपयांच्या विमल पान मसाला व 58 हजार 200 रुपयांची तंबाखू तसेच 24 हजार 140 रुपयांच्या कमला पसंद पान मसाला व 3 लाख रुपये किमतीच्या क्रुझर वाहन असा एकूण 8 लाख 22 हजार 264 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने हस्तगत केला आहे पुढील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांच्या ताब्यात सदरच्या माल देण्यात आला आहे.
सदरचे कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, प्रशांत बच्छाव अप्पर पोलीस अधिक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील, प्रकाश सोनार, कुणाल पाटील, संदीप सरग, उमेश पवार, रविकिरण राठोड, अशोक पाटील, विशाल पाटील ,यांच्या पथकाने केली आहे.
Tags
news




