तालुक्यातील आमोदे येथील मोटारसायकल चोरीप्रकरणी शहर पोलिसांनी चोपड्यातील दोघांच्या दोन दुचाकींसह आवळल्या मुसक्या





शिरपूर तालुक्यातील आमोदे येथून अज्ञातांनी केलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली व चोरी केलेली दुचाकींसह चोपडा येथील दोघांना रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले असून चोरीची कबुली दोघांनी दिली आहे.याप्रकरणी आणखी काही साथीदारांची नावे उघड होण्याची शकता आहे त्या दिशेने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे


          तालुक्यातील आमोदे येथील राकेश कोमलसिंग देशमुख यांची एम एच 18 एक्स 8697 ही दुचाकी रविवारी 24 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास  घरासमोर लावलेली दुचाकी चोपडा येथील शरद भालेराव बाविस्कर वय 39 सुदर्शन कॉलनी व अजय शाळीग्राम ठाकूर वय 34 रा. अरुण नगर दोघे हे चोरून नेत असतांना  आमोदे अजंदे रस्त्यावर काही लोकांना संशयितरित्या आढळून आल्याने लोकांनी विचारपूस केली असता वरील दोन्ही संशयित दुचाकी सोडून दुसऱ्या दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना एक संशयित लोकांच्या हाती सापडला.दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिसात राकेश कोमलसिंग देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या संशयितास शहर पोलिसांनी रात्री चोपडा येथून गुन्ह्यात वापरलेली एम एच 19 एजे 6656 दुचाकींसह ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्यात आतापर्यंत 2 मोटारसायकली व दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


           सदर कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पंकज पाटील,भरत चव्हाण,गोविंद कोळी विनोद आखडमल,मुकेश पावरा प्रवीण गोसावी,स्वप्नील बांगर,अमित रनमळे आदींनी केली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने