शहादा पं.स. उपसभापती पदी वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड

 



शहादा (कल्पेश राजपूत) :- शहादा पंचायत समितीच्या उपसभापती पदी सुल्तानपूर गणाचे वैशाली किशोर पाटील यांची बिनविरोध निवड. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे शहादा येथील पंचायत समितीचे उपसभापती पद गेल्या सहा-सात महिन्यांपासून रिक्त होते. ते आज (दि.२४) रोजी भरण्यात आले. रद्द झालेल्या जागांसाठी  ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.


                पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज माघार घेतल्याने अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपचा कल्पना श्रीराम पाटील व कॉंग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांचे प्रत्यकी दोन तर राष्ट्रवादीच्या ललिता राजेंद्र बाविस्कर यांनी एक नामांकन अर्ज दाखल केले परंतु अर्ज माघारीचया वेळी भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आप नामांकन अर्ज मागे घेतल्याने कॉंग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांची बिनविरोध निवड झाली असे पिठासीन अधिकारी डॉ . मिलिंद कुलकर्णी यांनी घोषित केले. 


                रद्द झालेल्या जागांसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांची निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती . निवडणूक निकाला अंती पंचायत समितीत कॉंग्रेसचे १४ , भाजपचे १२ , राष्ट्रवादीचे दोन सदस्य असे संख्याबळ आले होते. ही निवडणूक प्रक्रिया पंचायत समितीच्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ . मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले तर त्यांना गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी सहकार्य केले. दरम्यान अनेक दिवसांपासून शहादा पंचायत समितीच्या उपसभापती पदी कोणाची निवड होते. याकडे लक्ष लागून होते. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बहुमत बदलले असून उपसभापती पद हे काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे. या निवडीनंतर कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित उपसभापती व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी माजी मंत्री ऍड . पद्माकर वळवी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड . सीमा वळवी जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे , शहादा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक , गणेश पाटील , शशिकांत पाटील , चंद्रकांत पाटील, आदींसह कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने