क्षत्रिय महासभेचा कोजागिरी व दसरा मिलन कार्यक्रम दोंडाईचा येथे संपन्न



अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आयोजित कोजागिरी पोर्णिमा व दशहरा मिलन कार्यक्रम नुकताच दोंडाईचा येथील प्रताप रॉयल शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. 


अ भा क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रसिंह तंवर, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रसिंह चौहान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांच्या झूम मिटींग आयोजित सूचनेनुसार व धुळे जिल्हाध्यक्ष जसपालसिंह सिसोदिया यांच्या सहकार्याने उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा श्रीमती चंद्रकलाताई सिसोदिया यांनी दोंडाईचा येथे महिलांचा दसरा मिलन कार्यक्रम घेतला. 


सन १८९७ मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने संपूर्ण देशभर एकाच दिवशी जिल्हास्तरावर कार्यक्रम संपन्न झालेत. समाजाने एकत्र यावे, शस्र व शास्र पूजनाच्या सनातन परंपरांची जोपासना करावी, सामाजिक हितगुज करावे व नवीन संकल्प करावेत या हेतूने क्षत्रिय समाजातर्फे दरवर्षी 'दसरा मिलन' कार्यक्रम साजरा केला जातो. 


कार्यक्रमासाठी शिरपूर येथील महाराणा प्रतापसिंहजींच्या जीवन इतिहासाचे संशोधक, सुप्रसिद्ध वक्ते तथा लेखक श्री जयपालसिंह गिरासे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे सचिव प्राचार्य डी.एन.जाधव होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिरपूर तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, दोंडाईचा नगरसेविका मनीषा नरेंद्रसिंह गिरासे, मनीषा जितेंद्रसिंह गिरासे, ज्येष्ठ महिला सदस्या श्रीमती शांतादेवी जाधव उपस्थित होते. 


सांस्कृतिक आक्रमणे ही जमिनीवरच्या आक्रमणांपेक्षा घातक असून समाजाने ही आव्हाने वेळीच ओळखून प्रतिकारासाठी सज्ज होण्याची गरज आहे. आधुनिक काळासोबत समन्वय साधतांना प्रत्येकाला आपली सांस्कृतिक ओळख जपण्याचा नैसर्गिक हक्क आहे. सनातन भारतीय संस्कृतीने 'वसुधैव कुटुंबकम' चा नारा देऊन 'कृण्वन्तो विश्वमार्यंम चा उद्घोष केला होता. संस्कृती ही लादली जात नाही तर रुजविली जाते. 'दसरा मिलन समारोह हा नव्या संकल्पाचा आणि  सांस्कृतिक मूल्ये जोपासण्याचा निर्धार करण्यासाठी महत्वाचा आहे' असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व लेखक जयपालसिंह गिरासे यांनी केले. यावेळी शहरातील 200 क्षत्राणी उपस्थित होत्या. 

प्रास्ताविकातून सदर समारोहाचा उद्देश तथा भूमिका कार्यक्रमाच्या आयोजक तथा उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा श्रीमती चंद्रकलाताई सिसोदिया यांनी केली. सौ एस एन पाटील यांनी आभार मानलेत तर सौ ज्योत्स्ना पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने