प्लास्टिक कॅरी बॅग वापरू नका - शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे आवाहन




शिरपूर : प्लास्टिक कॅरी बॅग वापरू नका असे आवाहन शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे.

शिरपूर शहरातील व्यापारी, व्यावसायिक दुकानदार व नागरिक यांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक कॅरीबॅग वापरू नये. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1980 अन्वये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2006 अन्वये व शासन आदेशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या व 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी घालण्यात आली आहे.

शिरपूर शहरातील व्यापारी, व्यावसायिक दुकानदार व नागरिक असे प्लास्टिक कॅरीबॅग वापरताना आढळून आल्यास त्यांच्यावर प्लास्टिक कचरा अधिनियम 2016 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जाहीर आवाहन केले आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने