शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात बाफना ब्रदर्स तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ग्राहकांच्या सेवेसाठी शिरपूर शहरात बाफना इलेक्ट्रॉनिक्स म्हणून भव्य दालनाच्या शुभारंभ उद्या दिनांक 9 ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे सदर दालनाचे उद्घाटन मा. अमरीश भाई पटेल यांच्या आशीर्वादाने उपनगराध्यक्ष शिरपूर-वरवाडे नगरपरिषद मा. श्री भूपेशभाई पटेल यांच्या शुभहस्ते होणार असून सदर कार्यक्रमास तालुक्याचे आमदार काशिरामजी पावरा, नगराध्यक्ष मा. सौ जयश्री बेन पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार जी रंध्ये, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे तरी या प्रसंगी शिरपूर शहर व तालुक्यातील जनतेने कार्यक्रमास उपस्थित रहावे व या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाफना ब्रदर्स यांनी केले आहे.
शिरपूर शहरात बाफना परिवाराच्या बाफना मेडिकल च्या सेवेला 24 वर्ष पूर्ण झाले असून ग्राहकांची अमूल्य प्रेम व आशीर्वादाच्या बळावर बाफना ब्रदर्स शिरपूर शहरात भव्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनाचा शुभारंभ करत आहे. सदरच्या दालनात इलेक्ट्रॉनिक्स या सर्वच गृह उपयोगी वस्तू या एकाच छताखाली उपलब्ध होणार असून टी .व्ही. वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर ,इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट ,वॉटर प्युरिफायर व इतर असंख्य वस्तू या नामांकित कंपनी सॅमसंग, एलजी, हायर ,लॉयड, सोनी, वोल्टास ,टाटा, बजाज, बॉस्को, आयफबी इत्यादी नामांकित कंपनीचे वस्तू येथे उपलब्ध होणार आहे.
सदरचे दालन शिरपूर शहरातील करवंद नाका जवळ सेंट्रल बँकेच्या शेजारी शहादा रोड शिरपूर येथे सुरू करण्यात येत असून ग्राहकांनी आमच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक अशोक बाफना व राकेश बाफना यांनी केले आहे.
Tags
news

