सावळदे - सावळदे ता. शिरपुर येथे जि. प. मराठी शाळेत वाॅटर प्युरीफायर बसविण्यात आले. उपसरपंच सचिन जाधव यांनी साेनगीर टाेल प्लाझा कडून गावासाठी समाजपयोगी कामी येईल यासाठी याेगदान मिळावे. म्हणून लाडके नेते मा.चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या कडे शब्द टाकला हाेता. चिंतनभाई यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना याेग्य ते सहकार्य करण्याची सुचना केली. त्यानुसार साेनगीर टाेल प्राेजेक्ट मॅनेजर कृष्णराव, टाेल मॅनेजर इंतजार हुसेन, सुरक्षा अधिकारी लाला पुराेहित, टाेल एच. आर. सचिन पवार आदींना गावाचा सर्वे केला. व जि. प. साठी पाण्याचे फिल्टर देवुन सहकार्य केले. सावळदे येथील मराठी शाळा डिजीटल आहे. त्यात आणखी भर पडावी म्हणून पाठपुरावा करत वाॅटर प्युरीफायर आणले तर टाेल प्लाझा कडून वाॅटर कुलर व प्राेजेक्टर देण्यात येणार आहे.
सावळदे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मान्यवरांचे जाहीर आभार! व्यक्त करण्यात आले आहेत.
Tags
news


