शिरपूर प्रतिनिधी - आज राज्यभरात शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या मनमानी कारभार व वाढती महागाई याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सायकल रॅली काढून निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते .
राज्यात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत दोघांनी शंभरी गाठली असून सामान्यांचे जीवन जगणे असह्य झाले असून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे डिझेल च्या भावात होणाऱ्या सततच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून रोजच्या जीवनातील भाजीपाला किराणामाल यांच्या घरात देखील फार मोठी दरवाढ होत आहे या सर्वास केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच देशात महागाईने सर्वाधिक मोठा उच्चांक घातला असून आपकी बार महागाई सरकार जनतेला येत आहे
या सर्व बाबींच्या जाहीर निषेध करून जनजागृती करण्यासाठी व केंद्र सरकारच्या निषेध करण्यासाठी युवा सेनेने आज सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
आज दि.३१/१०/२०२१ रोजी युवासेना प्रमुख तसेच पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे तसेच युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी यांच्या सूचनेनुसार इंधन दरवाढ, वाढती महागाई विरोधात राज्यव्यापी सायकल रॅली आंदोलन शिरपूर तालुका युवासेनेतर्फे उपजिल्हायुवाधिकारी अनिकेत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते
यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत,उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,राजू टेलर,तालुका प्रमुख दिपक चोरमले ,अत्तरसिंग पावरा,युवासेना तालुका प्रमुख विजय पावरा, उपतालुकायुवाधिकारी जितेंद्र राठोड, बबलू शेख,उपशहर प्रमुख रेहान काझी,मनोज धनगर,सुनील सूर्यवंशी,शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,मसूदभाई शेख,वाजीद मलक,संजय जाधव,नना जाधव,शुभम पावरा,जावेद,शेख,जितेंद्र राजपूत, तेजस गुजर,आबा मराठे,अफसर मलक,अरबाज शेख,अनिल कोळी, चंदू भाऊ,गोपाल माळी, भुरा माळी,दिनेश गुरव,आकाश पावरा, सोनू पावरा आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
Tags
news





