शहादा तालुक्यातील असलोद येथे आठ दिवसापासून सुरू असलेल्या परमपूज्य कणकेशवरी देवी यांचा भागवत कथेचा समारोप झाला. हिंदी भाषेत झालेल्या या कथेचा सार मराठीतून अनुवाद करून बीएसपी फाउंडेशनचे उपाध्यक्ष हिंदी विषयाचे शिक्षक संजय जगताप यांनी प्रसारमाध्यमाने लोकांपर्यंत पोहचविले. त्याचे पुस्तकात रूपात रूपांतर करीत संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजु वानखेडे, उपाअध्यक्ष संजय जगताप, सचीव विलास पवार, खजिनदार दिपक पवार, व सर्व सदस्य याच्या वतीने प.पु.मा कनकेश्वरी देवीजींना भेट देण्यात आले. पुस्तकात दैनंदिन झालेल्या हिंदी भाषेतील प्रवचन व त्याचा सार दररोज बातमी रुपात प्रसारीत करण्यात आला.
भारत देशातील एका राष्ट्रीय संत आखाड्याच्या प्रमुख श्री १००८महामडलेश्वर प.पु.माॅ.कनकेश्वर देवी याचा श्रीमद् भागवत कथेचा हिंदी भाषेत महा प्रवचनाचा कार्यक्रम शहादा तालुक्यातील असलोद येथे असलोद ग्रामस्थांनी आयोजीत केला होता, या कार्यक्रमास पर राज्यातुन, महाराष्ट्रातील व असलोद परिसरातील भावीकांची मोठ्या संख्येत उपस्थीती लाभली होती, कथा ही आठ दिवस चालली, ही कथा भावीकांनी हिंदी भाषेतुन श्रवण केली, परंतु या हिंदी कथा प्रवचनाचा दैनंदिन कथासार थोडक्यात जनशक्तीच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात आला.
कथा ऐकण्यासाठी मध्यप्रदेशातील परमेश्वरानंद महाराज तसेच भालचद्र देशमुख,पवन जवेरी हे दैनंदीन हिदी भाषेत कथासार काढत होते, तो दैनंदिन हिंदी भाषेतील कथासाराच्या मदतीने हिंदी विषयाचे शिक्षक असल्याने स्वत: संजय जगताप यांनी त्याला पूर्ण रूप दिले.
Tags
news
