नाशिक -
आपल्या खान्देश मधील संगीत क्षेत्र सुद्धा बॉलिवूड ला टक्कर द्यायला निघाले आहे. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील भूमिपुत्र गोकुळ पाटील यांनी स्वतः लिहिलेले व निर्मित केलेले धमाल असे गीत *पोरी मांगे फिर* हे जी.पी. प्रॉडक्शन ह्या यु ट्युब चॅनेल वर प्रदर्शित झाले.
ह्या गाण्याचे संगीत प्रख्यात संगीतकार समीर शेख ह्यांनी केले असून आपल्या खान्देशातील सेलेब्रिटी सिंगर प्रशांत देसले ह्यांनी गायले आहे. ह्या गाण्यावर खान्देशाचा सुपरस्टार हिरो विनोद कुमावत आणि बॉलिवूड मधील मुंबई येथील अभिनेत्री मीनल यादव ह्यांनी डान्स केला आहे.
खान्देश मधील हे पहिले वहिले बॉलिवूड च्या धर्तीवर हे बिग बजेट गाणे प्रदर्शित झाले असून प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत.
गोकुळ पाटील यांनी यापूर्वी देखील संगीतक्षेत्रात भरीव कामगिरी केली असून जी पी प्रोडक्शन च्या माध्यमाने यापूर्वी देखील त्यांनी अनेक प्रसिद्ध अहिराणी मराठी गीते तयार केले असून त्यातून अनेक खानदेशी खरा कलाकार आता तर वाव मिळाला आहे इतकेच नव्हे तर बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकांच्या सोबत देखील त्यांनी काम करून अहिराणी मराठी गीतांच्या माध्यमाने खानदेशच्या गौरव वाढविला आहे .
यावेळेस प्रेक्षकांच्या भेटीस आले त्यांचे हे नवीन गीत पोरी मागे फिर याला यूट्यूबवर प्रेक्षकांच्या मोठा प्रतिसाद मिळत असून आपल्या खान्देश पुत्राच्या ही प्रसिद्ध गीत आपण जर अजून पाहिले नसेल तर एकदा अवश्य पहा चला तर मग युट्युब वर जी.पी प्रोडक्शन्स ला भेट द्या आणि हे गाणे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व या गाण्याचा आनंद घ्या व गीताला लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा अशी विनंती खान्देश पुत्र गोकुळ पाटील यांनी केली आहे.
https://youtu.be/Ju7zAjnxhIw
Tags
news



