मोटार सायकल चोरी करणारे तरुणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद होळनांथे व परिसरातून चोरट्यांची टोळी होती सक्रिय



शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात मोटार सायकल चोरीच्या वारंवार होत असलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील
अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे गुन्हे उघड
आणणेवायत आवश्यक ते मार्गदर्शन सूचना दिलेल्या होत्या.

सदर सुचनांचे अनुषंगाने माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखला माहिती मिळाली की, गोपाल भाईदास शिरसाठ रा. पिळोदा ता शिरपूर याने त्याचे काही या ठिकाणांवरन मोटार सायकल चोरुन त्या
परिसरात स्वस्तात विकलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दि.12/10/2021 रोजी गोपाल भाईदास शिरसाठ याचा शोध घेता तो शिरपूर फाटा येथे मिळून आल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे मित्र राकेश संजय कोळी, रा.टेकवडे ता. शिरपूर, गणेश सिताराम पवार, रा .आमोदे ता शिरपूर राजा कपूरदास बैरागी रा.आमोद ता. शिरपूर यांचे मदतीन मोटर सायकल चोरल्याचे कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ०३-होडा शाईन, २
ड्रीम युगा, ०१. सीडी डीलक्स,01 टी व्ही एस. स्टार सिटी,०१ युनिकॉन अशा 8 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत  २,४०,००० रुपये इतकी आहे. याबाबत अधिक तपास करून खात्री केली असता सदर मोटारसायकल चोरी संदर्भात भादवि कलम 379 अन्वये आजाद नगर पोलीस स्टेशन ,साक्री पोलीस स्टेशन अमळनेर पोलीस स्टेशन, शहादा पोलीस स्टेशन येथे तेलुगु नाहीतर सेंधवा येथे दोन गुन्हे दाखल आहेत.



वरील आरोपीतांना पुढील तपासकामी आझादनगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले असून, अधिक विचारपुस चालू
आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांचे
मार्गदर्शनात अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक शिवानी बुधवंत, सहा पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोउनि योगेश
राउत, असई सुनिल विधुरकर, पोना संतोष हिरे, पोना. मनोज पाटील, पोना चेतन कंखरे पोको .किशोर पाटील, कैलास महाजन इत्यादींच्या पथकाने केले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने