फार्मासिस्टला कोविड-19 योद्धा घोषित करून मोबदला देणे बाबत - मुख्यमंत्र्यांना निवेदन

फार्मासिस्टला कोविड-19 योद्धा घोषित करून मोबदला देणे बाबत - मुख्यमंत्र्यांना निवेदन



शिरपूर - मागच्या दीड वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाची महामारी चालू आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स, सफाई कर्मचारी अजून बरेच आहेत पण डॉक्टर, नर्सेस आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांना केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कडून त्यांना कोविड योद्धा घोषित करण्यात आले आणि विमा यासारख्या सुविधा त्यांना देण्यात आल्या पण त्याच्यासोबतच फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे कौतुकाची थाप मिळाली नाही आणि 8 ऑक्टोबर 2021 यादिवशी सरकारच्या माध्यमातून निवासी डॉक्टरांना प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये त्यांना मदत जाहीर केली तर कोरोनाच्या काळामध्ये फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी यांनी पण ऋग्नसेवा केलेली आहे तरी त्यांना याबद्दलचा कोणताही मोबदला मिळालेला नाही, कोविड काळामध्ये आपली सेवा बजावत असताना जा फार्मसिस्ट चा मृत्यू झाला त्यांना पण सरकारच्या माध्यमातून कुठली मदत पोहोचलेली नाही. तरी संघटनेमार्फत सरकारला विनंती केली आहे की फार्मासिस्ट ला कोविड योद्धा घोषित करा आणि फार्मासिस्ट नी केलेल्या रुग्ण सेवेची दखल घेत त्यांना सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यात यावी कोविड योद्धा आमचा हक्क आहे. असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्र्यांना डॉ. पंकज एम चौधरी प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय फार्मसी असोसिएशन यांच्या कडून देण्यात आले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने