आ.रावल यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या वारुडे यांच्या विरुद्ध कारवाई साठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदन





शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातुन आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुक्यातील समस्त राजपूत समाज व सर्व समाज समावेशक शिष्टमंडळाने व भाजपाच्या काही प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या राजकीय पदाधिकारी ललित वारुळे यांच्या जाहीर निषेध करून विविध अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.

आज राजपूत समाजाच्या काही प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी सो व पोलीस अधिक्षक सो धुळे यांना निवेदन दिले आहे



याबाबत वृत्त असे की नुकत्याच जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत बेटावद गटातून निवडून आलेले ललित वारुळे यांनी विजय प्राप्त केल्यानंतर उत्साहाच्या भरात सामाजिक भान हरपून अशोभनीय कृत्य केले असून आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या बद्दल जाहीरपणे अपशब्दांच्या वापर केला आहे. आमदार जयकुमार भाऊ रावल हे फक्त दोंडाईच्या परिसरातीलच नव्हे तर खानदेशचे नेतृत्व करत असून राजपूत समाजासह सर्व समाज घटकांचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे जयकुमार रावल यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व समाज बांधवांमध्ये याबाबत संताप व्यक्त होत असून अशा अशोभनीय विकृतीच्या जाहीर निषेध केला जात आहे. राजकारणात जय-पराजय होत असतात एकमेकांवर टीका टिपणी देखील केली जाते मात्र त्यास काही प्रमाणात संविधानिक मर्यादा असते व संयमित  भाषेचा वापर करून आपले मत प्रदर्शित करण्याच्या प्रत्येकास अधिकार असतो. मात्र ललित वारुडे यांच्याकडून द्वेष भावनेने वापरलेले अपशब्द हे निंदनीय असून शिरपूर तालुक्यातील सर्व  समावेशक समाज बांधवांनी या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या पूर्वी काल
  जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार जी रंधे ,भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बबनराव चौधरी, रावसाहेब प्रभाकर चव्हाण ,काशिनाथ जी रावळ, नगरसेवक राजू अण्णा गिरासे ,नगरसेवक देवेंद्र गिरासे, नगरसेवक हर्षल राजपूत, नितीन बाबा राजपूत ,राज देशमुख अंबालाल राजपूत, जगदीश नाना, नगरसेवक हेमंत पाटील, मानव एकता पार्टीचे सुभाष सिंह जमादार, कल्पेश सिंह जमादार ,केवल सिंह राजपूत, रत्नदीप सिसोदिया , गटलू राजपूत, जगदीश पाटील यांच्यासह भाजप चे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व  सर्वसमावेशक समाजाचे राजकीय व सामाजिक स्तरावरील प्रतिनिधी  यांनी शिरपूर प्रशासनास निवेदन दिले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने