शिंदवाणी ग्रामस्थांनी मा.पंचायतराज समिती विधानसभा ला व मा.गोसावी गटविकास अधिकारी सो. धडगांव यांना प्रत्येक्षा भेट देऊन बर्डीपाडा शिंदवाणी गावाच्या ग्रामस्थांनी अंगणवाडी सेविकेचे पद रद्द करण्याची मागणी




प्रतिनिधी = कृष्णा कोळी 

धडगाव  
आम्ही धडगांव तालुक्यातील बर्डीपाडा शिंदवाणी या गावाचे कायम चे रहिवासी असून शिंदवाणी गावात  सुमारे 14 वर्षा पासून सौ.लाडकीबाई रमेश पाडवी ह्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे पण सेविका हि मागील ४ वर्षापासून अंगणवाडी केंद्रावर येथ नाही.   अंगणवाडी सेविका हि प्रत्येक्षा बर्डीपाड्यावरिल अंगणवाडी केंद्र येत नाही. सेविका हि स्वःताच्या छापर्‍यापाडा येथे एकूण ६५ लाभार्थ्यांना स्वः ता च्या घरी बोलवून पुरक पोषण आहार, लसीकरण,आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा,अनौपचारिक शाला-पुर्व शिक्षण,पोषण आणि आरोग्य शिक्षण आदी  देत असते. संबंधीत प्रशासनाचे व कोणत्याही विभागाचे अधिकारी अंगणवाडीला भेट देण्यासाठी येतात तेव्हा अधिकार्‍यांना दिशाभूल करून हिच बर्डीपाड्याची अंगणवाडी आहे  असे सांगुन फसवणूक करित असते.
अंगणवाडी सेविकाच्या भोंगड कारभार संदर्भात ग्रामस्थांनी मा. संगिता पाडवी सरपंच राजबर्डी व मा.आतिष चव्हाण ग्रामसेवक ग्रामपंचायत राजबर्डी व पंचायत समिती धडगांव, एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प तोरणमाळ च्या मा.संगिता नाईक प्रकल्प अधिकारी यांना तक्रार करून सुध्दा ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही.  जिल्हा परिषद नंदुरबार कार्यलयाकडून एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प तोरणमाळ मार्फत संबंधीत सौ.लाडकीबाई रमेश पाडवी यांना पञ प्राप्त झाले. तरी या पञातील आदेशाचे पालन सेविकेकडून होतांना दिसत नाही.  
प्रत्येक्षा बर्डीपाडा या अंगणवाडी केंद्राला मा.संगिता नाईक प्रकल्प अधिकारी तोरणमाळ,मा.गटविकास अधिकारी धडगांव, नर्मदा बचाव चे पदाधिकारी व सरपंच व ग्रामसेवक आदिनी भेटी देऊन  श्री.रमेश आबाला पावरा यांच्या घरात भाडेतत्वावर अंगणवाडी केंद्र भरवण्यात यावे अशी सुचना व लेखी पञ दिले. पण या सर्वप्रशासनाचे आदेशाचे उल्लंघन करतांना सौ.लाडकीबाई पाडवी दिसत आहे.  या संदर्भात ग्रामस्थांनी आज मा.महाराष्र्ट विधानमंडळ पंचायतराज समिती   व मा. गोसावी सो. गटविकास अधिकारी धडगांव ला निवेदन देऊन  ग्रामस्थांना न्याय मिळावे या संदर्भात निवेदन देऊन मागणी केली.
निवेदनावर श्री.जोमा जिर्‍या पावरा पोलीस पाटील शिंदवाणी, भाईदास पावरा, रमेश आबला पावरा,सौ.कविता जर्मनसिंग पावरा अंगणवाडी मदतनीस, जोरदार बोटा पावरा, जिखर्‍या पावरा,विजय पावरा,प्रकाश पावरा, सौ.चुही पावरा, सौ.सेकली वळवी, सौ.नमीबाई पाडवी,सौ.यमुनाबाई पाडवी, सौ. हिना पाडवी,वंती पावरा,मनिषा पावरा,संगिता पावरा, संजय पावरा, दिलीप पावरा, ठुमला पावरा,झिंगा आबला पावरा, आदि पालक व ग्रामस्थांच्या सह्या व अंगठे आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने