दोंडाईच्या ज्येष्ठ नागरिक संघात गीत संध्या कार्यक्रम संपन्न







दोंडाईचा प्रतिनिधी -  दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी कोजागिरी पौर्णिमा निमित्त दोंडाईचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या ताईसाहेब जमादार सभागृहाच्या प्रांगणात संध्याकाळी 6 ते 9 च्या दरम्यान दोंडाईचा येथील गीतकार श्री अशोक सोनवणे यांच्या गीत संध्या कार्यक्रम सेवानिवृत्त हेडमास्तर श्री एम बी बोरसे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .


सदर सदर कार्यक्रमात गीतकार अशोक सोनवणे यांनी भक्ती गीत व भावगीत आणि देशभक्तीपर गीत यांच्या दमदार व मधुर आवाजात सादरीकरण केले. गीत संध्या कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस. पी . गिरासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
 या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावून गीत काराच्या गीतांना दाद दिली.


 कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत संस्थेचे सचिव श्री सुरेश ढोमन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त ज्युनिअर महाविद्यालयाचे प प्रा. गोकुळ सैंदाणे सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री एम बी बोरसे सर यांनी गीतकार अशोक सोनवणे ,सूत्रसंचालक प्रा.  गोकुळ सैंदाणे आणि आयोजक यांच्याविषयी गौरवास्पद भावना व्यक्त केल्यात .आभार प्रदर्शन संस्थेचे प्रभारी कोषाध्यक्ष श्री सुरेश चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी कोजागिरी पौर्णिमा निमित्त उपस्थितांनी मसालेदार दूध पानाच्या आस्वाद घेतला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने