शिरपूर - आज शिरपूर तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात व पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या इंधन दारांच्या विरोधात
राष्ट्रवादी युवक काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.मेहबुबभाई शेख, कार्याध्यक्ष मा.सुरजभैय्या चव्हाण, व कार्याध्यक्ष मा.रविकांतदादा वर्पे यांच्या सुचनेनुसार व जिल्हा नेते डॉ.जितेन्द्र ठाकूर व राष्ट्रावादी युवक काॅग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.मयूरभाऊ बोरसे पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली व श्री.दिनेशदादा मोरे,प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्योग व व्यापार व श्री.शिरीषदादा पाटील,तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शिरपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशातील पेट्रोल,डीझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या संदर्भात भाजपा केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष श्नी.आशिषकुमार अहिरे यांच्या नेतृत्वात शिरपूर येथे दि.२१ आॅक्टोबर २०२१ रोजी शहरात बैलगाडीवर मोटर सायकल ठेवून कन्या हायस्कूल पासून पाच कंदील मार्गे गुजराथी कॉम्प्लेक्स जवळील पेट्रोलपंपा पर्यंत निषेध रॅली काढत आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी आंदोलनात धीरज सोनवणे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग, श्री.निलेश गरुड, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री.राकेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग,कु.शुभम पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, कु.भुपेश पाटिल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, श्री.वाजीद शेख, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग, श्री.जाकीर शेख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग,श्री.बाळकृष्ण पाटील, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री.कांतीलाल पाटील, समाधान भवरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, स्वप्निल पाटील, सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, जगदीश पाटील, सहसचिव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, भुषण पाटील, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, दुर्गेश पटेल, संघटक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, श्री.डॉ.राहुल साळुंखे,श्री.संजय पवार, कु. गौतम थोरात, श्री. निंबा पाटील,श्री.अर्जुन पाटील, श्री.बापु कोळी, श्री.संजय मोरे, श्री. आप्पा मोरे,कु.समाधान पाटील,आनंद पवार व इतर पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.
Tags
news