आपला गाव आपला विकास अंतर्गत शिरपूर पंचायत समितीची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कामचोर ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना सुनावले,22 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस तर एकाच्या निलंबनाचे आदेश





शिरपूर - पंचायत समितीच्या सभागृहात ग्राम विकास कामांसंदर्भात बुधवारी दुपारी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली़ 


        देशाला 75 वर्ष पूर्ण झाले तरी अजून ग्रामीण भागाचा पाहिजे तेवढा विकास स्थानिक पातळीवर पदाधिकारी व अधिकाऱ्यांमुळे झाला नसल्याने  ग्रामसेवकांनी डोळ्यात तेल घालून कॉपी पेस्ट न करता विकास कामे करावीत असे ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी ठणकावत बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर होत असलेल्या विविध योजना व घरकुल यांच्याबाबत माहिती विचारली असता संबंधित अधिकाऱ्यांना सुयोग्य आकडेवारीनुसार माहिती देता आली नाही या कारणास्तव संतप्त होत संबंधितांची कानउघडणी करण्यात आली व यापुढे आपल्या कामात सुधारणा न झाल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे देखील खडे बोल सुनावले. यात 22 ग्रामसेवकांना कामात कसूर केला म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले असून एका ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश देण्यात आला आहे.


       याप्रसंगी धुळे डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  तडवी, गटविकास अधिकारी वाय डी़ शिंदे अमर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ राजेंद्र बागुल,बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, गटशिक्षणाधिकारी एस़ सी़ पवार ग्रामसेवक,बांधकाम विभागाचे अभियंते,कृषी,सिंचन,शिक्षण ग्रामपंचायत विभागाचे रोजगार हमी योजनेचे आदि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी ग्रामसेवकांना विकास आराखडा तयार करून विकास कामे त्वरीत करण्याचे आदेश दिले तसेच काही अडचणी येत असल्यास वरिष्ठांकडून मार्गदर्शन व लोक प्रतिनिधीना विश्वासात घेत गावाचा विकास आराखडा तयार करून घेत पंतप्रधान मोंदी व मुख्यमंत्री ठाकरेंच्या महत्वकांक्षी आवास योजनेची कामे वेळेत पूर्ण करून लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आवाहन करीत ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने