जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याचा घेतला आढावा,



धुळे जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी आज बुधवारी शहर पोलीस ठाण्यात पोलीस दरबार व पोलिस पाटलांची बैठक घेत शहर पोलीस ठाण्याच्या कामाचा आढावा घेतला.


        धुळे जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील हे बुधवारी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा वार्षिक  आढावा घेण्यासाठी आले होते दरम्यान पोलिस अधीक्षकांनी सकाळी पोलीस दरबार घेत  समस्या जाणून घेत गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शन केले.तसेच दुपारी   शहर पोलीस हद्दीच्या गावातील पोलिस पाटलांची बैठक घेत अवैध धंद्यांची माहिती घेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले. दरम्यान सकाळी 10 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांचे शहर पोलीस ठाण्यात आगमन झाल्यावर पोलिसांनी सलामी देत स्वागत केले पोलीस अधीक्षक प्रविण कुमार पाटील यांनी दिवस भर शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून  गुन्ह्यासंदर्भात वार्षिक आढावा बैठक घेत गुन्ह्यासंदर्भात व संभाव्य घटना संबंधात मार्गदर्शन केले तसेच यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील पोलीस पाटलांची बैठक घेऊन अवैध धंद्यांना बाबत माहिती जाणून घेतली तसेच पोलीस पाटलांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी पोलीस पाटलांनी मांडलेल्या समस्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पोलिस पाटलांना दिले.यावेळी पोलीस पाटील संघटनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दिवसभराच्या कामकाजा नंतर सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी शहर पोलिस ठाण्याच्या कामाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने