शिरपूर/प्रतिनिधी-शिरपूर शहरातील क्रांती नगर या भागात तालुका विधीसेवा प्राधिकरणामार्फत जनजागृती पर पथनाट्याचा कार्यक्रम झाला. विधी सेवा प्राधिकरण शिरपूर तालुक्याच्यावतीने विधी सेवांबाबत विविध कार्यक्रम घेऊन संपुर्ण तालुक्यात जनजागृती करण्यासाठी तसेच विधी सेवांची माहिती व कायद्याचे ज्ञान व्हावे म्हणून जनजागृती पर कायदेविषयक पथनाट्याचे क्रांती नगर चौक येथे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व शिरपूर दिवाणी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश म.संभाजी देशमुख हे होते. तसेच त्यांचे सोबत शिरपूर येथील सह.दिवाणी न्यायाधिश म.शितोळे साहेब हे देखील उपस्थित होते त्याचेसोबत शिरपूर वकिल संघाचे अध्यक्ष श्री.अॅड.एस.के.महाजन व उपाध्यक्ष श्री.अॅड.वाय.व्ही.ठोंबरे हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड.विशाल आर.मेटकर व अॅड.श्याम आर.पाटील यांनी प्रयत्न केले व परिसरातील नागरीकांनी उत्सुफर्त प्रतिसाद दिला. कायदेविषयक पथनाट्यात भुमिका पार पाडणारे कलावंत श्री.तुषार शिवणेकर, कु.गायत्री अशोक बाविस्कर, कु.गौरी कैलास सोनार,कु.यशवंत माळी (प्रेम),श्री.किशोर राजपुत (राणा) तसेच अॅड.विशाल आर.मेटकर,अॅड.श्याम आर.पाटील यांनी भुमिका केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.विशाल आर.मेटकर यांनी केले.आभार अॅड.श्याम आर.पाटील यांनी व्यक्त केले.
Tags
news



