धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे आयोजन 30 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले होते. तथापि, या दिवशी विधानसभेच्या देगलूर- बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. त्यामुळे सदरची परीक्षा आता 30 ऑक्टोबर 2021 ऐवजी 21 नोव्हेंबर 2021 रोजी होईल. या बदलाची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे सुधारित वेळापत्रक असे : प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे -26 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2021. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- 1- 21 नोव्हेंबर 2021, वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- 2- 21 नोव्हेंबर 2021, वेळ दुपारी 2 ते 4.30.
Tags
news



