धुळ्यातील लोकसंपर्क अभियानात नऊ कोटी 67 लाखांचे कर्ज स्वीकृती पत्र



धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीयकृत बँकांच्या सहभागाने आयोजित लोकसंपर्क अभियानात 549 प्रकरणात नऊ कोटी 67 लाख रुपये रकमेचे कर्ज स्वीकृती पत्र संबंधित 549 लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक मनोजकुमार दास यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.




सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय, नाशिक व अग्रणी बँकेच्या सहकार्याने रचना हॉल येथे लोकसंपर्क अभियानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या अभियानात बँकेचे विविध शाखांचे व्यवस्थापक आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या अभियानात कर्ज स्वीकृती रकमेची माहिती अशी (अनुक्रमे विभाग, संमत झालेली प्रकरणे , रक्कम कोटींमध्ये या क्रमाने) : कृषी – 484, 6.39. एम. एस. एम. ई- 25, 1.46. रिटेल- 40, 1.82. एकूण 549 प्रकरणे, 9 कोटी 67 लाख रुपये. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने