20 हजारांची लाच घेताना पोलिसच अँटी करप्शनच्या जाळ्यात





 जळगाव - जळगाव जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ माजली असून वीस हजारांची लाच घेताना महिला दक्षता विभाग पथकातील पोलीस अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली केली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील  महिला दक्षता विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला  20 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून  अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागने ही कारवाई बुधवारी (दि.13) दुपारी सापळा रचून  केली. या कारवाईमुळे जळगाव पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे.
मिलींद केदार असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात केदार यांनी एका प्रकरणात तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीमध्ये 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिली.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना केदार यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या पथकाने केली.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने