शिरपूर - आज दि.१४/१०/२०२१ अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्याच्या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले,यात महामार्गावरील खड्डे तसेच पुलाचे कठडे तुटले असून ते दुरुस्त व्हावे तसेच 3 दिवसांच्या मुदतीच्या आत काम झाली पाहिजेत नाहीतर आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल या आशयाचे निवेदन शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अलीभाई तसेच उपाध्यक्ष आशपाकभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-शिवशक्ती वाहतूक सेनेतर्फे देण्यात आले यावेळी शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष मसूदभाई शेख,युवासेना उपजिल्हाधिकारी अनिकेत बोरसे,तालुकाध्यक्ष वाजीद,शहराध्यक्ष विजय पवार मलक,सुनील सूर्यवंशी,युवासेना उपतालुकाअधिकारी वाल्मीक कोळी,शहर सचिव गणेश बिरारी,आबा मराठे, उपशहराध्यक्ष जावेद शेख, तन्वीर सय्यद,दानिश शेख, टिपू शेख, शकिर शेख, अरबाज शेख, समीर सैय्यद, अजीज खान आदि शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
news


