रत्नागिरी:भास्कर लहू बागूल ह्या आदिवासी शिक्षकाला शाळेत हजर करून घेणे व सुडबुद्धीने आदिवासी शिक्षकाचा मानसिक व आर्थिक छळ करून पैशाच्या अपेक्षेने शाळेत हजर करून न घेणा-या व जीवे ठार मारण्याची धमकी देणा-या मुख्याध्यापिका श्रीम.अर्चना रामचंद्र पाटील( हिरवे) यांना सेवेतून बडतर्फ करा या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेचे दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद सातारा येथे धरणे आंदोलन आहे.
या आंदोलनाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा तसेच पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे सातारा यांना बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिले आहे. निवेदनाची पोहच घेण्यात आली आहे.
भास्कर लहू बागूल ह्या आदिवासी शिक्षकाचा माहे नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 20201अखेरचा पगार मुख्याध्यापिका अर्चना पाटील यांनी जाणीवपूर्वक अडवला होता. सुशिलकुमार पावरा यांच्या पत्रव्यवहाराने व पाठपुराव्याने 14 महिन्याचा पगार सदर शिक्षकाला देण्यात आला होता.त्याचबरोबर या प्रकरणात मुख्याध्यापक यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी सातारा यांनी दिनांक 22/01/2021 चौकशी सुद्धा लावली होती. तदनंतर शिक्षकाला पगार देण्यात आला.परंतु पुन्हा सुडबुद्धीने व पैशांच्या अपेक्षेने आदिवासी शिक्षकाला हजर करून घेतले नाही व त्यानंतरचा पगार अजूनही देण्यात आला नाही. अशी तक्रार भास्कर बागूल ह्या आदिवासी शिक्षकाने बिरसा फायटर्स संघटनेकडे केली.
निवेदन देऊनही शिक्षकाला हजर करून घेतले नाही व दोषी मुख्याध्यापिका वर कारवाई झाली नाही म्हणून बिरसा फायटर्स संघटनेने दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सातारा समोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाला जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी शामिल व्हावे असे आवाहन बिरसा फायटर्स संघटनेने केले आहे. याच दिवशी अन्यायग्रस्त भास्कर बागूल ह्या आदिवासी शिक्षकाचे उपोषण सुद्धा आहे. आदिवासी शिक्षकावरचा असा अन्याय खपवून घेतला जाणार नाही,दोषींवर कारवाई करायलाच लावू ,अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.
Tags
news
